रहिपुरी परिसरात लांबविली जनावरे

अज्ञात चोरट्यांविरुध्द मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
चाळीसगाव:तालुक्यातील रहिपुरी येथील शेतकरी आपल्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली जनावरे मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सविस्तर असे, चाळीसगाव तालुक्यातील रहिपुरी येथील मुरलीधर हनुमंत गुंजाळ (वय-48) येथे आई, पत्नी, मुलगा व मुलगी परिवारासह वास्तव्यास आहेत. वडिलोपार्जित शेती असल्याने गुंजाळ हे शेती हा व्यवसाय करतात. रहिपुरी शिवारात शेती असल्याने शेतात जणावरांसाठी पत्र्याचा शेड आहे. त्यात जणावरे बांधलेली असतात. मात्र, नेहमीप्रमाणे 8 मार्च रोजी रात्री 10 वाजेपर्यंत मुरलीधर गुंजाळ हे काम करून घरी परतले. 9 मार्च रोजी सकाळी 6 वाजता शेतात गुंजाळ हे पोहोचल्यावर काय तर शेडमध्ये जनावरे नव्हती. एकप्रकारे त्यांना धक्काच बसला. लगेच त्यांनी मेहुणबारे पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमाविरूध्द फिर्याद दाखल केली.