जिल्हाधिकार्यांचे आदेश
जळगाव: सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र 14 मार्च, 2020 अन्वये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्चपासून लागू करुन खंड, 2,3, व 4 मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेली आहे. ज्या विशिष्ट प्रवर्गातील जनता कर्फ्यूमधून सूट देण्यात आलेली आहे. त्यांनी आपल्या सोबत आपले कार्यालयाचे, आस्थापना, शाळा, महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच 14 मार्च 2021 रोजी होणार्या एम.पी.एस.सी. परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट सोबत बाळगणे अनिवार्य राहील, असेही जिल्हाधिकार्यांनी आदेशात नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्यात व देशांतर्गत कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात कोविड, 19 विष्णाणुमुळे रुग्ण संख्येत वाढत होत आहे. त्यामुळे त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. याकरीता जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव हद्दीत कडकडीत लॉकडाऊनबाबत निर्बंध लागू न करता कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना यांनी ‘जनता कर्फ्यू’ द्वारे काही निर्बंध लागू करण्याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार नियमावली जाहीर करुन नागरिकांना सुचित करणे आवश्यक आहे. जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत 11 मार्च 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 15 मार्च रोजी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपावेतो ‘जनता कर्फ्यू’ घोषित करण्याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत आहे. नागरिकांना या दिवशी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
‘जनता कर्फ्यू’ दरम्यान जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत यासोबतच्या ‘परिशिष्ट 3’ मध्ये नमूद केल्यानुसार आस्थापना, बाबी, ह्या सुरु बंदी राहतील. तसेच ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर विभागाच्या परीक्षा आयोजित करण्यात येत असल्याने कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेकरीता नेमलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान लागू केलेल्या निर्बंधातून सूट राहील. जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत घोषित करण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ चे तंतोतंत पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलीस विभाग व महानगरपालिका यांची संयुक्तिक राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (450) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1873 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.
जळगाव शहर मनपा हद्दीत काय बंद राहील त्याचा तपशील
रेल्वे, बस, विमान सेवा, जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक, टॅक्सी कॅब, रिक्षा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचार्यांची वाहन व परीक्षेला जाणार्या विद्यार्थ्यांसाठी, चारचाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहने व परीक्षेला जाणार्या विद्यार्थ्यांसाठी केवळ 1 +2, दुचाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहने व परीक्षेला जाणारे विद्यार्थ्यांसाठी (केवळ 1+1), मेडीकल स्टोअर्स, हॉस्पिटल ओपीडी, आयपीडी, मेडीकल स्प्रा मेडीकल स्टॉप व वाहतूक अॅम्ब्युल्स सेवा, दूध खरेदी विक्री केंद्र, कृषी संबंधित अस्थापना. जेथे पूर्व नियोजित परीक्षा आहेत, अशा शाळा, महाविद्यालये, कृषी सेवा केंद्रे, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा, शासकीय कार्यालये (50 टक्के उपस्थिती), बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा. पेट्रोल पंप (फक्त अत्यावश्यक सेवाची वाहने व ऑटो, रिक्षा तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचारी याची वाहने व परीक्षाला जाणर्या विद्यार्थ्यांसाठीचे वाहने), कुरीअर, गॅरेज, वर्कशॉप्स, सर्व प्रकारची माल वाहतूक, वृत्तपत्र, मीडिया सेवा, कोविड 19 लसीकरण कार्यक्रम.
जळगाव शहर मनपा हद्दीत काय बंद राहील त्याचा तपशील
शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, हॉटेल रेस्टॉरस्ट (होम डिलेव्हरी पार्सल, वगळता), किरकोळ भाजीपाला, फळे, खरेदी- विक्री केंद्रे, धार्मिक स्थळे, सभा मेळावे, बैठका, शासकीय, खासगी बांधकामे (मान्सून पूर्व काम वगळून), शॉपींग मॉल्स, मार्केट, किरणा दुकाने इतर सर्व दुकाने , लिकर शॉप, बार्बर शॉप, स्पा, सलून, खासगी कार्यालये, गार्डन पार्क बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रीडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन, आठवडी बाजार, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम.