भुसावळ : कोरोना नियमांचे पालन करीत अंत्यत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पाच जोडपे विवाह बंधनात अडकले. भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, विभाग भुसावळतर्फे मंगळवारी संतोषी माता हॉलमध्ये सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोळ्यात यात लोकेश कोल्हे व राजश्री चौधरी, कौतीक भारंबे व विनीता चौधरी, अक्षय फेगडे व विशाखा चौधरी, हर्षल चौधरी व विजया भोसले तर अंध जोडपे दीपाली बाळू उबाळे व मंगेश अशोक धीवरे ही जोडपी विवाह बंधनात अडकली.
यांची होती उपस्थिती
यावेळी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश पाटील, प्रकल्प चेअरमन आरती चौधरी, मंगला पाटील, अॅड.प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, सुहास चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, शरद फेगडे, अजय भोळे, महेश फालक, परीक्षीत बर्हाटे, डिगंबर महाजन, मो.मुन्वर खान आदी उपस्थित होते. शासनाच्या नियमानुसार, काटेकोर पालन करून हा सोहळा झाला. या विवाह सोहळ्याला केवळ 50 जणांची उपस्थिती होती. किशोर शिंपी, राजेंद्र फेगडे, दिनेश राणे, संतोष टाक, सुरेश जावळे, आणि महाराष्ट्र राज्य विज कामगार संघटना यांचे अनमोल सहकार्य लाभले. दरम्यान, संस्थेतर्फे प्रत्येक जोडप्याला गॅस शेगडी, मिक्सर, वस्तूंचे वितरण करण्यात आले.