शहाद्यात जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद

भाजी मंडई , बससेवा, किराणा दुकाने या महत्त्वाच्या सेवाही बंद

शहादा: क़ोरोना च्या दुस-या लाठेत रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने शनिवारी व रविवार जनता कर्फ्यु लागू केल्याने शहादा शहरातील बाजारपेठ गल्ली ते काॅलनी मुख्य परिसर चौका-चौकात रस्त्यावर शुकशुकाट असून कोरोना वर मात करण्यासाठी शहाद्यातील व्यापारी बांधवांनी आप आपले छोटे-मोठे सर्व व्यवहार दुकाने बंद ठेवून कर्फ्यू ला शंभर टक्के प्रतिसाद दिला असून इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्यातले गुजरात व मध्य प्रदेश च्या सीमेवर असलेले शहादा शहर ठप्प झाले आहे.

जगभरात कोरोना व्हायरस थैमान घातले असून दुस-या टप्प्यातील व्हायरस‌ देशाच्या महाराष्ट्रसह विवीध राज्याच्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे हा व्हायरस जलद गतीने पसरून यांची लागन होत असल्याने यांची लागन थांबविण्यासाठी स्थानिक पातळीवर शनिवार -रविवार हे दिवस जनता कर्फ्यू म्हणून पाळला जात आहे, याच पार्श्र्वभूमीवर शहाद्याकऱ्यानी सर्व‌ व्यवहार दुकाने बंद ठेवून आपले विवीध कार्यक्रम वगळून आप-आपल्या घरातच थांबून कोरोना व्हायरस ला पळविण्यासाठी शहादेकर सज्ज असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे,शहरातील मुख्य परिसर,बस स्टँड, गांधी पुतळा,मेन रोड, बाजारपेठ, काॅलनी, गल्लीतील चौका-चौकात शुकशुकाट असून अनेकांनी घरातच रहाणे पसंत केले आहे,तसेच जनता कर्फ्यू च्या पार्श्र्वभूमीवर नागरीकाची रस्त्यावर व बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन भूमिका बजावत असल्याचे चित्र होते तसेच मुख्य परिसरातील बाजारपेठत बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासना तर्फे वारंवार करण्यात येत आहे.

आज जनता कर्फ्यु निमित्ताने सकाळपासूनच पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व नगरपालिका कर्मचारी कार्यरत होते महसूल व पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांनी घरी थांबावे अशा सूचना दिल्या जात होत्या अनेक ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना जबरदस्ती केल्याच्या घटना शहरात घडल्य तर माध्यम प्रतिनिधीनांही पोलिसांच्या त्या वर्तणुकीची झळसोसावी लागली. प्रांताधिकारी डॉक्टर चेतन गिरासे, तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ. उपविभागीय पोलिस अधिकारी धुमरे, पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांच्यासह महसूल, पोलिस विभागाचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भाजी मंडई , बससेवा, किराणा दुकाने या महत्त्वाच्या सेवाही बंद आहेत