आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या निधीतून संगणक वाटप

रावेर : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विधान परीषद सदस्य डॉ सुधीर तांबे यांच्या निधीतून रावेर तालुक्यातील विवरे येथील श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूलमध्ये तालुक्यातील सहा शाळा व एक वाचनालय यांना संगणक, प्रिंटर व प्रोजेक्टर वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी रावेर तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी, जळगाव जिल्हाघ्यक्ष मुख्याध्यापक संघाचे जे.के.पाटील, ग.स.सोसायटीच्या माजी संचालिका कल्पना पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे, रावेर तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष ललित चौधरी, अ‍ॅड. राहुल मुजुमदार,श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक ए.जी.महाजन, ए.डी.चौधरी, दिलीप पाटील, श्री रमेश पाचपांडे, तुषार पाचपांडे, किरण सुरळकर, आर.बी.पाटील, जगदीश घेटे, कल्पना सपकाळे, अशोक पाटील, पी.के.चौधरी, बाळू महाजन, उमेश राणे, सुरेश गायकवाड, जितेंद्र महाजन उपस्थित होते.