खापर मध्ये मिळणार दोन एप्रिल पासून कोरोना लस

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. टी.एच.मालखेडे यांनी जनशक्तीला दिली माहिती

खापर – प्राथमिक आरोग्य केंद्र(आरोग्य वर्धिनी केंद्र) येथे शुक्रवार दिनांक 2 एप्रिल 2021 पासून कोरोना लसिकरण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. टी.एच.मालखेडे यांनी दै जनशक्ती बोलतांना दिली.
अक्कलकुवा तालुक्यातील विविध आजार असणारे रुग्ण व 60 वर्षावरील व्रुद्ध नागरीकांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात लसिकरण केले जात असून दररोज शेकडो नागरिकांना लसिकरण करण्यात येत आहे. परंतु खापर व परिसरातील वयोव्रुद्ध नागरीकांना अक्कलकुवा जाणे खर्चिक व वेळखाऊ होते त्यामुळे नागरिक लसिकरण करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात जात नव्हते.
खापर येथे नुतन इमारतीचे नुकतेच लोकार्पण झाले असून येथे कोरोना लसीकरण करण्याची सोय करावी अशी मागणी होती. त्या मागणी नुसार उद्या शुक्रवार दिनांक 2 एप्रिल2021 पासून खापर येथील आरोग्य केंद्रात दुपारी 01-00 वाजेपासूनच  45 वर्षावरिल सर्व नागरीकांना कोराना पासून बचाव होण्यासाठी लसिकरण करण्यात येणार असून नागरीकांना या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. टी.एच.मालखेडे यांनी केली असून लसिकरणाला येतांना आधार कार्ड, पेन कार्ड,रेशन कार्ड किंवा ओळखिचा कुठलाही पुरावा सोबत घेउन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.