जामनेर – तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासकीय पातळीवर कोरोना नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना राबवील्या जात आहे. असे असतांना दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधीकारी यांच्या कोरोनाच्या विषयावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. आज राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांनी भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. त्याला भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांनी पत्रकार परीषदेच्या माध्यमातून उत्तर दिले. या दोन्ही पक्षाच्या पदाधीरी यांच्यामध्ये होत असलेले आरोप तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
नागरीक कोरोनाने त्रस्त, आमदार महाजन निवडणूकीत व्यस्त – संजय गरुड
राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महामारी सुरू असताना आमदार गिरीश महाजन हे ‘म तदार संघातून गायब कसे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांनी येथे पत्रकार परीषदेत उपस्थित केला. . आमदार महाजन यांना बंगालची भाषा येत नाही. नवडणुकीच्या या कार्यक्रमात ते कुठेही दसत नाहीत. ईव्हीए हॅक करण्यात ते पटाईत आहेत. बंगाल मध्ये ईव्हीएम हॅक करण्यासाठी ते गेले असावेत असा आरोपही संजय गरुड यांनी व्यक्त केले.
राज्यामध्ये तसेच मतदारसंघाध्ये कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वच जण उपाय योजना शोधताहेत. कोविड सेंटरची गरज असून ऑक्जसिजन व्हेंटीलेटरचा तुटवडा भासत आहे. चांगले कर्तव्यदक्ष डॉक्टर कर्मचारी अशा विविध समस्यांवर उपाययोजना करून आज कोरोनाने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना मदतीची आवश्यकता आहे. आमदार महाजन बंगालमध्ये काय करत आहेत? हा मोठा प्रश्न आहे. इकडे मात्र त्यांचे कार्यकर्ते, आरोग्यदूत रेमडेसीवीर इंजेक्शन जादा भावाने वीकून काळाबाजार करीत असल्याचा आरोप संजय गरुड यांनी केला. बीओटी कॉम्प्लेक्स संदर्भात झालेल्या गैरव्यवहाराबाबत बोलताना संजय गरुड म्हणाले की ज्या टपरी धारकांचे अतिक्रमण काढून कॉम्प्लेक्स बांधले गेले त्यांना कॉम्प्लेक्समध्ये सर्वात आधी दुकाने देणे आवश्यक होते. झेडपीमध्ये या कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी विरोध दर्शवला असेही गरुड म्हणाले. या पत्रकार परीषदेला राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, संदीप हवाळे, जीतेश पाटील,आदी कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.
कोरोना काळात गरूडांनी काय दिवे लावले ? – चंद्रकांत बावीस्कर
राष्ट्रवादचे नेते संजय गरुड यांनी आतापर्यंत किती कोविड सेंटरला भेटी दिल्यात? सत्ताधारी म्हणून त्यांची नैतीकता नाही का? आतापर्यंत आपण किती रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यात? किती व्हेंटीलेटर उपलब्ध करून दिले? आपण व आपल्या कार्यकर्त्यांनी काय दिवे लावले हे आधी सांगावे असे प्रत्युत्तर भाजपाचे जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांनी पत्रकार पत्षरदेत दिले.
ते पुढे म्हणाले कीआमदार महाजन यांनी जळगाव व जामनेर येथे कोविड सेंटर उभे केले. व्हेंटीलेटरची व्यवस्था करून दिली. वेळोवेळी रुग्णांच्या व रुग्णांच्या नातेवाईकांच्या भेटी घेऊन त्यांना धीर दिला. आमदार महाजन व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक कोविड सेंटर‘ध्ये जाऊन रुग्णास सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली. दहा-बारा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. आज राज्यात संजय गरुड यांच्या पक्षाची सत्ता आहे. सत्येचा उपयोग त्यांनी ‘तदार संघासाठी करायला हवा. आरोप करणे सोपे आहे. परिस्टथिती बिकट असताना राजकारण करू नका असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. बीओटी कॉम्प्लेक्सच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त अभी यंता व जी प सदस्य जे.के. चव्हाण यांनी या पत्रकार परीषदेत सांगीतले की बीओटी कॉम्प्लेक्सचे बांधका‘ हे तत्कालीन त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शासनाची मंजुरी घेऊन बांधण्यात आलेले आहे. यात कुठलाही गैरव्यवहार नसल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परीषदेला शिक्षण संस्थेचे सचीव जीतेंद्र पाटील, न.पा. गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, तालुका सरचीटणीस रवींद्र झाल्टे, अतीश झाल्टे, शेख रीजवान व अन्य पदाधीकारी यावेळी उपस्थित होते.