सचिन वझे बडतर्फ होणार ?

 

मुंबई :एनटीलीया बाहेर स्फोटके ठेवण्याच्या आरोप असलेले व राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत असलेले आरोपी सचिन वाझे यांना बई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र आत्ता त्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यासाठी मुंबई आयुक्तालयात हालचाली सुरू झाल्या असल्याचे वृत आहे.

अंबानी यांना धमकी, व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएसह राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून(एटीएस) मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने माहिती मागवली होती. या दोन्ही यंत्रणांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून वाझे यांचा सहभाग स्पष्ट करणारे टिपण आयुक्तालयास दिले आहे. यासाठी त्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.