धोनीचे आई-वडीलांना कोरोनाची लागण

रांची : भारतीय क्रिकेट संघाला ज्या कर्णधाराने दोन विश्वचषक जिंकून दिले त्या महेंद्र सिंघ धोनीच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना रांचीमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

धोनीच्या आई-वडिलांची प्रकृती स्थिर असून त्यांची ऑक्सिजन पातळी चांगली आहे. कोरोनाचे संक्रमण फुप्फुसापर्यंत पोहचू शकलेले नाही, त्यामुळे ते लवकर कोरोनामुक्त होतील, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.