जळगांव शहरातील कोविड हॉस्पिटल्सचे फायर ऑडीट करा.

जळगाव – जळगांव शहर महानगरपालिचे समिती सभापती राजेंद्र झिपरु पाटील यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना कोविड हॉस्पिटल संधर्बाद निवेदन दिले. ज्यात , शहरातील सर्व कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडीट करावे असे सांगण्यात आले आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात ठिक ठिकाणी हॉस्पिटलचे नव्याने कोविड-19 हॉस्पिटल मध्ये रुपांतरण होत आहे. त्या ठिकाणी मोठया प्रमाणात कोविड-19 या आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड-१९च्या या संक्रमणाच्या काळात विविध शहरात विविध अपघाती घटना घडत आहेत. वसई विरारमध्ये विजय वल्लभ या हॉस्पिटलमध्ये एसी युनिटमध्ये झालेल्या शॅार्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. म्हणून अशा दुर्घटना टाळण्यासाठी आपल्या जळगांव शहरातील या सर्व कोविड हॉस्पिटलचे मनपा तर्फे फायर ऑडीट होणे गरजेचे आहे. तरी फायर ऑडीट करणे बाबतची कार्यवाही तात्काळ योजवावी असे निवेदन जळगांव शहर महानगरपालिचे स्थायी समिती
सभापती राजेंद्र झिपरु पाटील यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिले.