महापालिकेची मास विक्रेत्यांवर कारवाई !

जळगाव- भगवान महावीर जयंती दिनी मास विक्रीला बंदी असतानाही भास्कर मार्केट परिसरातील 7 चिकन  विक्रेते व दंगलग्रस्त कॉलनीमधील 2 मटण विक्रेत्यांवर रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पो लिसांनी कारवाई केली. यात प्रत्येक विक्रेत्यांवर 2 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
भास्कर मार्केट परिसरातील चिकन विक्रेते इमराम सजाद खाटीक, ए वन चिकन सेंटरचे अजीज खाटीक,  शेख खलील शेख याकूब, गोपाळ दगडू राऊळकर, ईश्‍वर दगडू राऊळकर, बाबू उस्मान खाटीक, सातपुडा  चिकन सेंटरचे सईद दादामियाँ खाटीक, तसेच दंगलग्रस्त कॉलनीतील मटण विक्रेते आसीफ अजीज खाटीक,  जाकीर असलम खाटीक यांच्यावर कारवाई कारवाई झाली.
.