भुसावळ : शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्याने घरी कुणी नसताना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री 8.55 वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे ठोस कारण अद्याप कळू शकले नाही. विशाल सुरेश पिवाल (40, रा.ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ) असे मयत कर्मचार्याचे नाव आहे. पिवाल हे भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आयएएन डीस्ट्रीक विभागात कार्यरत असून त्यांची पत्नी व मुले गावाला राजस्थान येथे गेले आहेत. घरी कुणी नसताना पिवाल यांनी आत्महत्या केल्याने नेमके आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेनासाठी हलवला. हवालदार मोहमद वली सैय्यद यांनी शहर पोलिसात तुकाराम दत्तात्रय शिंगे यांच्या खबरीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.