जळगाव- पोलनपेठ परिसरातून सुमारे 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लांबवल्याचे रविवारी सायंकाळी उघडकीस आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे.
ममुराबाद येथील मयूर अर्जुन कोळी (वय 17) हा तरुण पोलनपेठमधील अग्रवाल फॅन्सी फटाक्याच्या दुकानात कामाला आहे. त्याने मोटारसायकल (क्र.एमएच 19 बीडब्ल्यू 642) दुकानाजवळ लावली होती. मयूर घरी जाण्याच्या वेळी मोटारसायकल लावलेल्या जागेवर आला. परंतु, त्यास मोटारसायकल दिसली नाही. याबाबत त्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपास नाईक किशोर निकुंभ करीत आहेत.