तळोदा प्रतिनिधी||
आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या संकल्पनेतून तळोदा शहरात सर्व सोईयुक्त २५ बेड चे ऑक्सीजन युक्त कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या कोविड सेंटर चे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल,जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड,जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.आमदार निधीतून मंजूर झालेल्या रुग्ण वाहिकेचे ही लोकार्पण करण्यात येणार आहे.त्याच बरोबर ५ रोजी सकाळी ६ वाजता आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या हातोडा रस्त्यावर ओपन जिम चे लोकार्पण,हातोडा रस्त्यावरील प्रवेशद्वार ला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करत त्या प्रवेशद्वाराचे भूमिपुजन करण्यात येणार आहे.तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्नाणा फळ वाटप करण्यात येणार आहे,अशी माहिती देण्यात आली.
हे देखील वाचा
२५ बेडचे सोयीयुक्त ऑक्सीजन युक्त कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.या कोविड सेंटर शहरातील,व परिसरातील नागरिकांनी तसेच सामाजिक संस्थांनी मदत केली असून सामाजिक संस्था यांनी पुढे येत या कोविड सेंटर ला मदत करावी असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे..
आमदार कार्यालय येथे ४ युवक २४ तास सेवा देतील.अत्यावश्यक सेवा असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,
या पत्रकार परिषदेला आमदार राजेश पाडवी,नगराध्यक्ष अजय परदेशी,भाजपा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी,माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपुत,स्वीय सहाय्यक विरसिंग वळवी,प्रा विलास डामरे,भाजपा युवा मोर्चाचे जगदीश परदेशी,दिपक चौधरी आदी उपस्थित होते.