राजमालतीनगरातील दंगलप्रकरणामधील पाच जणांना अटक

जळगाव- दूध फेडरेशन जवळील राजमालतीनगरातील दंगलप्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. या अगोदर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.
राजमालतीनगराजवळील एका शेतात क्रिकेट खेळण्यावरुन व तरुणीच्या छेडखानीप्रकरणी 1 मे रोजी दोन गटात दंगल उसळली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी रिजवान गफूर पटेल (वय 23), कलीम हरुण पटेल (वय 28), दुसर्‍या गटातील विजय पांडुरंग सुरवाडे (वय 60), राजकुमार अजय सुरवाडे (वय 24), विलास कालू ब्राम्हणे (वय 31) यांना सोमवारी अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहेत.
.