जळगाव- चाळीसगावहून लग्न समारंभ आटोपून जळगावकडे येत असताना रस्त्यावरील उभ्या ट्रँक्टरवर कार मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पाचोरा रोडवरील हडसन गावाजवळ आदळली. यात कारमधील चार जण जखणी झाले.
या अपघातामध्ये स्वप्निल चंद्रकांत पाटील (वय 27), अजय गजानन देशमुख (वय 27) व निखिल अशोक पाटील व राहुल अशोक पाटील (वय 23, मुक्ताई कॉलनी, एसएमआयटी परिसर) हे जखमी झाले आहेत. जखमीमधील अजय देखमुख हा नगरसेविका जयश्री देशमुख यांचा मुलगा आहे. कारची एअरबँग वेळीच उघडल्याने मोठा अनर्थ टळला. जखमींना दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.