न्हावी रस्त्यावरील सातपुडा कोविड सेंटर येथे लोकवर्गणीच्या 50 बेडचे उद्घाटन

फैजपूर- गेल्या एक महिन्यापासून सातपुडा कोवीड सेंटरमध्ये पन्नास बेड ची ऑक्सीजन प्रणाली यंत्रणा लोकवर्गणीतून उभारण्यात आली होती मात्र त्यासाठी लागणारा ऑक्सिजन उपलब्ध होत नव्हता व त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित होत नव्हती अखेर ड्युरा सिलेंडर उपलब्ध झाल्याने न्हावी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या न्हावी रस्त्यावरील 50 बेडच्या सातपुडा कोवीड सेंटर मधील ऑक्सिजन प्रणाली व ऑक्सिजन ड्युरा सिलेंडरचे गुरुवारी सकाळी 11 वाजता महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज,शास्त्री भक्ती किशोर दास व आ शिरीष चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान आमदार शिरीष चौधरी यांच्या निधीतून दोन मोठ्या ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर ची याठिकाणी उपलब्धता झाल्यावर या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले या एका सिलेंडर मध्ये वीस लहान सिलेंडर एवढा ऑक्सिजन असणार आहे त्यामुळे परिसरातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार आहे
यावेळी मसाका चेअरमन शरद महाजन, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, नायब तहसीलदार आर डी पाटील, गटविकास अधिकारी निलेश पाटील, जि प सदस्य प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, अनिरुद्ध सरोदे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, कृउबा सभापती तुषार पाटील ,नारायण चौधरी,कदीर खान, अनिल जंजाळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी, मंडक अधिकारी जे.डी बंगाळे तसेच डॉ बी बी बारेला डॉ अभिजीत सरोदे, डॉ सौरभ तळेले, डॉ प्रसाद पाटील व संजय राजपूत यांची उपस्थिती होती.
फैजपूर शहरात लवकरच लस उपलब्ध होणार

फैजपूर शहर हे 40 ते 50 हजार वस्तीचे शहर आहे मात्र या ठिकाणी covid-19 लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना फैजपूर येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या न्हावी ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी जावे लागते शहरात लस उपलब्ध व्हावी यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधून तात्काळ फैजपूर शहरात लस उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले आहे त्यामुळे आता नागरिकांना शहरात लस कधी उपलब्ध होणार याची वाट पाहावी लागणार आहे?