धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

जळगाव- हावडा मेलमधून पाय घसरल्याने खाली पडून तरुण प्रवाशाचा गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील म्हसावद जवळ मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
अबजूर शेख जियाऊल हक (वय 23, रा. रहिमपूर, माणिकचक, इनायतपूर, जि. मालदा-पश्चिम बंगाल) हा तरुण त्याचा भाचा मसीद ऊर रहेमान यांच्यासोबत रमजाननिमित्त मुंबईहून पश्चिम बंगालमधील गावी जाण्यासाठी गुरुवारी सकाळी 8 वाजता मुंबईहून रेल्वेत बसला. दुपारी 3 ते 3.30 वाजेच्या दरम्यान मुंबई-हावडा मेल जळगावकडे येत होता. या वेळी अबजूर शेख हा पाणी पिण्यासाठी रेल्वे बोगीच्या दरवाजाजवळ गेला. मात्र, पाय घसरल्याने तो खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रेल्वे खंबा क्रमांक 400/ 13-15 जवळ घडला. याबाबत म्हसावद रेल्वे स्टेशन मास्तर राजपूत यांनी जळगाव रेल्वे पोलिसांना माहिती दिली. हेड कॉन्स्टेबल अनिंद्र नगराळे यांनी घटनास्थळ धाव घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच शवविच्छेदन झाले. यानंतर मृतदेह भाचा मसीद ऊर रेहमान यांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतजळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.