यावल : तालुक्यातील किनगाव बु.॥ येथील महेश पंढरीनाथ माळी या बेपत्ता शेतकर्याचा स्वताः च्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळला आहे. किनगाव बु॥ येथील माळी वाड्यातील रहिवासी असलेले महेश पंढरीनाथ माळी (40) हे 16 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शेतात जाते म्हणून दुचाकीने बाहेर पडले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत परतले नाही. शेतात जावुन शोध घेतला विहिरीच्या ठिकाणी दुचाकी व बुट आढळला मात्र माळी आढळले नाही. गावातील कैलास कडु थाटे यांनी विहिरीत शोध घेतला असता माळी यांचा मृतदेह न आढळल्याने पोलिसात किरण पंढरीनाथ माळी यांनी पोलिसात हरवल्याची नोंद केली मात्र सोमवारी दुपारच्या सुमारास महेश माळी यांचा मृतदेह किनगाव शिवारातील त्यांनी केलेल्या नफ्याच्या शेतातील विहिरीत आढळला. माळी यांनी आत्महत्या केली की विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलिस अंमलदार सुनील तायडे करीत आहेत.