जळगाव- कोरोनाच्या कालावधीत शासनाचे नियम न पाळता मेहरुण तलावाच्या परिसरात सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फोटो, व्हीडीओ शुटींग करणार्या 10 जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहने व शुटींगसाठीचा कॅमेरा असा एकूण चार लाख 25 हजार रुपये किमतीचा ऐवज ताब्यात घेतला आहे.
या शुटींगबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना कळाले. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी तत्काळ मेहरुण तलावाचा परिसर गाठला. डॉ.सुनील नाहटा यांच्या बंगल्याजवळ काही तरुण-तरुणी मास्क न लावता, सोशल डिस्टन्सचे पालन न करता व्हीडीओ शुटींग करीत होते. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याजवळ शुटींगची परवान
गी सुद्धा नव्हती. पोलिसांनी वृशाल नितीन राठोड (वय 20, सुप्रीम कॉलनी, नितीन साहित्यानगर, मूळ रा.पळासखेड नाईक, जि.बुलढाणाम), मनोज भिका जाधव (वय 20, धोबी वराड), सुरज रंजे सोनार (वय 19, रा.रामेश्वर कॉलनी), अभिजीत रमेश चव्हाण (वय 25, सुप्रीम कॉलनी), आनंद उर्फ गणेश सोमनाथ भोई (वय 21, रा.जुने मेहुणबारे, ता.चाळीसगाव), सचिन चंद्रकांत भिरुड (वय 23, पिंप्राळा), गोपाळ जगदीश राठोड (वय 19), ईश्वर रोहिदास राठोड (धोबी वराड), रिना यशवंत जाधव (वय 20, शिवकॉलनी) व जामनेर येथील एका 20 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. याबाबत कॉन्स्टेबल नामदेव देविदास पाटील यांनी फिर्याद दिली.
Next Post