कोरोनाचा राज्यासह देशाला मोठा फटका बसला आहे. कित्येकांचे जिवलग कोरोनामुळे सोडून गेले आहेत. अश्यातच अभिनेत्री श्रेया बुगडेने सुद्धा आपल्या जिवलग दोन व्यक्ती गमावल्या आहेत. त्याम्हणजे आपल्या दोन मावश्या.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून श्रेया प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या कॉमेडी क्वीनवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे. या कार्यक्रमातील एका भागामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी श्रेया बुगडेशी गप्पा मारत होता. दरम्यान त्याने श्रेया कठीण काळातून जात असल्याचे सांगितले आहे. करोनामुळे तिच्या दोन मावशींचे निधन झाले आहे.