नीलेश भोईटे गटाकडून घरावर दगडफेक; जयवंत भोईटे यांनी केली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

जळगाव- मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेचा वाद उफाळून संस्थेचे संचालक जयवंत भोईटे यांच्या मुक्त
ाईनगरातील विठ्ठलपार्कमधील घरावर सोमवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास दगडफेक झाली. ही
दगडफेक नीलेश भोईटे व त्यांच्या समर्थकांनी केली, अशी तक्रार जयवंत भोईटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक
डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे केली.
जयवंत बाबूराव भोईटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जयवंत भोईटे हे जळगाव जिल्हा मराठा
विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेचे संचालक आहेत. संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी के
लेल्या गैरकारभारप्रकरणी न्यायालय आणि अनेक विभागांकडे तक्रारी केलेल्या आहे. त्यामुळे नीलेश भोईटे व
त्यांच्या सोबतच्या काही जणांनी अनेक वेळा ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. यासंदर्भात पोलिसात वेळोवेळी
तक्रारी दिल्या आहेत. आता नीलेश भोईटे, कल्पेश भोईटे व इतरांनी 24 रोजी पहाटे दीड ते दोन वाजेच्या
सुमारास घरावर दगडफेक व हल्ला केला. कल्पेश भोईटे याने घराच्या कंपाऊंडमध्ये शिरुन शिविगाळ केली.
नीलेश भाऊंच्या विरोधात आडवा येतो का? हा फक्त ट्रेलर आहे. आठवडाभरात नीलेश भाऊ तुला व तुझ्या प
रिवाराला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. शेजारील रहिवासी घराबाहेर आल्याने कल्पेश व इतर जण
घरापासून पसार झाले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलो असता त्यांनी फक्त अदखलपात्र
गुन्हा दाखल केला. या हल्ल्यामुळे घरातील महिला व मुलं घाबरले आहेत. याप्रकरणी नीलेश भोईटे, कल्पेश
भोईटे व त्यांच्या सोबतच्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जयवंत भोईटे यांनी केली
आहे.