गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्कार गर्दीप्रकरणी अखेर 50 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्क
प्रसंगी उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिपेठपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गर्दीसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी लक्ष वेधून कारवाईची मागणी केली होती.

हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 25 मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार झाले. यावेळी अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने गर्दी होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन, प्रशासनाने सोशल डिस्टन्ससह अनेक निर्बंध लावले आहे.  परंतु, गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. यामुळे प्रशासन या प्रकरणी कारवाई करणार का ? असा प्रश्‍न माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी ट्विटरवरुन प्रशासनाला विचारला होता. तर याबाबतत्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टॅग केले होते.  या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक व फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांच्यासह अन्जणांविरुद्ध दाखल झाला आहे.