भरधाव ट्रकने एकाला चिरडले!

चाळीसगाव:  एका ३५ वर्षीय व्यक्ती हा कामानिमित्त एमआयडीसी कडे पायदळी जात असताना मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना धुळे-औरंगाबाद बायपासवरील खडकी चौफुलीवर घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 याबाबत अधिक माहिती, मयत अरूण पंडित सुळ (वय-३५ रा. कुलस्वामिनी, हिरापूर रोड, खडकी ब्रु.) ता. चाळीसगाव हे कामानिमित्त एमआयडीसी कडे पायदळी जात असताना मागून भरधाव ट्रकने (क्र. एच.आर. ७४ अ- ८१५६) अरूण पंडित सुळ यांना धडक दिल्याने त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला. हि घटना २६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धुळे-औरंगाबाद बायपासवरील खडकी चौफुलीजवळ घडली. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ट्रक चालकाला त्याचे नाव विचारले असता अब्दुल हमीद रहमत (वय-४८ रा. घासेडा, राज्य- हरियाणा) असे सांगण्यात आले. अंत्यविधी आटोपल्यानंतर उशिराने प्रविण लक्ष्मण सुळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ व १८४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.