जळगाव । शहरात पाणी पुरवठा करणे कामी अमृत पुरवठा योजनेंतर्गत वाघुर पंपीग येथे 500 अश्वशक्ती नवीन
पंप मोटारसह बसविणे व 33 केव्ही सबस्टेशन मधील विद्युत देखभालीची कामे तसेच 1168 मीमी रायझीग मेनवरील एअर व्हॉलचे, स्लुईस व्हॉल बदलविणेचे काम दि. 29 रोजी हाती घेत असल्याने शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहेे. दि.29 रोजीचा पाणीपुरवठा 30 रोजी, दि. 30 रोजीचा 31 रोजी तसेच 31 मे चा पाणीपुरवठा 1 जून रोजी करण्यात येईल. अशी माहिती माहिती जळगाव शहर महानगर पालिकेतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
30 रोजी होणारा पाणीपुरवठा
खंडेरावनगर दुसरा दिवस- पिंप्राळा गावठाण, पिप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, पिप्राळा टाकी मानराज टाकी दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीका आश्रम, वाटीका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, खोटेनगर, टाकीवरील राहिलेला भाग, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग, नित्यानंद टाकीज दुसरा दिवस – नित्यानंद, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरीत भाग, डी.एस.पी बायपास- तांबापुरा, शामाफायर समोरील पसिरत, डी.एस.पी. टाकीवरुन – जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलजी, महाबळ कॉलनी परिसर, नुतन वर्षा कॉलनी, चैत्रबन कॉलनी, आनंदनगर, तिवारीनगर, बाहेती शाळा इ. भगवाननगर, रामदासनगर, कोल्हे नगर, अबिका सोसायटी , शिवकॉलनी इ. मेहरुण भागातील राहिलेला परिसर मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपूरी परिसर. अयोध्यानगर दुसरा दिवस- सद् गुरुनगर, हनुमाननगर, लिलापार्क,गौरव हॉटेल परिसर.
31 रोजी होणारा पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळा पर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीरामपेठ, नविपेठ, हौसिंग सोसा., शाहुनगर, प्रतापनगर. गेंदालाल मिल टाकीवरील भाग – खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको. रिंगरोड संपूर्ण – भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर. आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग – जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ. हेमुकलाणी टाकीवरील परिसर – गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर. डायरेक्ट – सुप्रिम कॉलनी परिसर. डी. एस. पी. टाकी – सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंत नगर परिसरातील उर्वरीत भाग, श्रध्दा कॉलनी, नंदनवन नगर, चर्चरोड 15 इंची व्हॉल – प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी. गिरणा टाकी आवारातील उंच टाकी – वाघनगर, हरिविठ्ठल नगर. गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग. नित्यानंद टाकी- समता नगर, स्टेट बँक कॉलनी, धांडेनगर इत्यादी. मेहरुण ईकबाल कॉलनी, मिलत्त नगर पाणीच्या टाकीचा परिसर.
1 जून रोजी होणारा पाणीपुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर. नित्यांनदनगर टाकी परिसर – मोहननगर, नेहरुनगर परिसर खंडेरावनगर परिसर – हरीविठ्ठल नगर, पिंप्राळा गांवठाण परिसर, गायत्रीनगर, नुतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी. मानराज टाकीवरील भाग – दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी. खोटेनगर टाकीवरील भाग – द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर. गेंदालाल मिल टाकीवरील – शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी. परिसर. डायरेक्ट – योगेश्वर नगर, हिरा पाईप व शंकरराव नगर व खेडीगांव परिसर. डी.एस.पी. टाकी – तांबापुरा, गणपती नगर, आदर्शनगर व इतर परिसर.शिवकॉलनी, विदयुत कॉलनी, राका पार्क,पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग. अयोध्यानगर पहिला दिवस- गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौ.सोसा., जगवानीनगर मेहरुण पहिला दिवस- सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर.