बोदवड : नगरपंचायतीच्या बनावट सही-शिक्यांचा वापर करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील आराध्य कन्ट्रक्शनचे चालक अमोल शिरपूरकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभाग क्रमांक सातमधील रहिवासी प्रतिभा अनिल कोकाटे व मितेश अग्रवाल यांना इमारत बांधकामासाठी बँक कर्ज काढायचे असल्याने त्यांनी बांधकाम शिरपूरकर यांच्याकडे दिले होते. बँकेत हे प्रकरण कर्जमंजुरीसाठी आले असता, त्यावर नगर पंचायत मुख्याधिकार्यांची स्वाक्षरी नव्हती. बँकेने यासाठी नगर पंचायतीला पत्र दिल्यानंतर त्यावर महसूल कराची एक लाख 22 हजार रुपयाची रक्कम भरली नसल्याचे आढळून आले व बनावट सही शिक्क्यांचा वापर झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नगर पंचायतीचे बांधकाम अभियंता रीतेश बच्छाव यांनी फिर्याद दिल्यावरून आराध्य कन्ट्रक्शनचे चालक अमोल शिरपूरकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.