जागतिक तंबाखु विरोधी दिवसानिमित्त ब्रह्माकुमारीज् मेडिकल प्रभागातर्फे आयोजित वेबिनारमध्ये तंबाखु सोडण्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब केल्यास व्यसनमुक्तिच्या दिशने पहिले पाऊल आपण टाकु शकतो असा आशावाद मुंबई येथील सुप्रसिद्ध व्यसनमुक्ती मार्गदर्शक डॉ. सचिन परब यांनी केला.
31 मे संपूर्ण जगात तंबाखु विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधुन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विभाग आणि दिव्य प्रकाश सरोवर युट्यूब वाहिनीमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ. सचिन परब, डॉ. किरण पाटील, सौ. चेतना विसपुते आणि डॉ. विशाखा गर्गे या वक्त्यांनी तंबाखु मुक्तीसाठी अनुभवयुक्त मार्गदर्शन केले.
पंचसूत्री
प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ. सचिन परब यांनी तंबाखु मुक्तीसाठी पंचसूत्री याप्रंसगी सांगितली. प्रथम सूत्र – तंबाकू सोडण्यासाठी दृढसंकल्पाची आवश्यकता आवश्यकता आहे. कुठलीही बाह्य गोष्ट तुम्हास परावृत्त करणार नाही तर केवळ स्वत:ची आंतरीक ईच्छाच तंबाकु सोडण्यासाठी मदद करेल. द्वितीय सूत्र – माझ्या नंतर माझ्या कुटुंबाचे काय? हा प्रश्न तंबाकु घेतांना नेहमी स्वत:शी विचारा. त्यांच्या हालअपेष्ठांचे चित्र निश्चित तुमच्या डोळ्यासमोर उभे राहील, हा विचारही तुम्हास परावृत्त करेन. तृतिय सूत्र – प्रतिबंध करणे. तुम्ही दोन सुत्र आत्मसात करुन तंबाखु सोडण्याच्या दिशेने वाटचाल केली की मित्र मंडळी आग्रह करेल तेव्हा स्पष्टपणे नकार द्यावा. चतुर्थ सुत्र – सकारात्मक दबाव गट तयार करा. तुमच्या भोवती चांगले व सकारात्मक विचार करणारे तुम्हास व्यसनापासून परावृत्त करणा·या मित्रांचा गट तयार करा तो तुमचे रक्षण करेन. पंचम सूत्र – रिप्लेसमेंट करा. व्यसने सुटल्यानंतर चुकचुकल्यासारखे होते. तेव्हा त्याबदल्यात काही तरी चांगले करा. जसे बडीशोप, धनादाळ खा, ओवा-तिळ खा. आणि त्याबरोबर काही छंद जोपासा. या पंचसूत्रांचा अवलंब केल्यास निश्चितपणे तुम्हास तंबाखु तथा तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनापासून निश्चितपणे आपण मुक्त होऊ शकतात.
लाशों के सौदागर मत बनो –
याप्रसंगी तंबाखु आणि तंबाखुजन्य पदार्थ निर्मिती करणा·या कंपन्याना डॉ. सचिन परब यांनी आवाहन केले की, प्रतिवर्षी 13 लाख आणि दररोज साडे तीन हजार माणसांच्या बळी घेणा·या तंबाखुचे उत्पादन करुन या कंपन्या व्यसनाधिन माणसाच्या मृत्युवर आपला व्यवसाय करीत आहेत. ज्या घराचा कर्ता पुरुष, मुलगा, वडील तंबाखु मुळे जातो त्या घरातील सदस्यांच्या तळतळा या व्यवसायाशी संबंधित सर्वच घटकांवर येतो. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ अर्थकारणाने यावर प्रतिबंध होत नाही. त्यासाठी प्रतिबंध हा सर्वस्वी आपल्या हातातच आहे. मागणी आणि पुरवठा हे बाजापेठेचे सूत्र असल्याने तंबाखुची मागणीच कमी झाली तर या कंपन्यांनाही त्यांचा व्यवसाय आवरता घ्यावा लागेल.
नियंत्रणापेक्षा निर्मुलनावर भर –
आज सरकारचा तंबाकु नियंत्रण कायदा आहे मात्र त्यापेक्षा तंबाखु निर्मुलन कायदा केल्यास समुळ उच्चाटनाच्या दिशनेच वाटचाल करावी असेही डॉ. परब यांनी सांगितले. नियंत्रण म्हणजे हे काही अंशी प्रोत्साहन देण्यासारखेच असते. तंबाखु हा नियंत्रणाचा विषय नसून निर्मुलनाचाच विषय आहे.
उगवत्या सुर्याची तांबडी किरणे लाभदायक :
याप्रसंगी सौ. चेतना नितीन विसपुते, अध्यक्षा चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगाव यांनी सात्विक आहार, योगासने, प्राणायाम आणि दररोज उगवत्या सुर्याकडे पाहून त्यांची तांबडी किरणे आपल्यावर पडू द्यावी जेणे करुन सकरात्मक उर्जा आपल्यात येईल व आपणास व्यसनमुक्तीची प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन केले.
तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि मेडिकल प्रभागाचे कार्य डॉ. किरण पाटील, रेडिआलॉजिस्ट यांनी स्पष्ट केले. डॉ. विशाखा गर्गे यांनी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून आलेली तंबाखु मुक्तिची प्रतिज्ञा वाचन केले. ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी स्वागत तर डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सूत्रसंचलन व आभार व्यक्त केलेत.