जळगाव – शहरातील व्यापारी संकुलात व्यवसाय करत असलेल्या व्यापार्यांनी अखेर संभ्रमावस्थेत मंगळवारी सकाळी आपापली दुकाने उघडली. दोन महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यासह राज्यात
राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही वस्तू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. प्रादुर्भाव कमी करण्यात या सगळ्याचा जरी उपयोग झाला असला तरी यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले होते. अखेर 1 जून पासून सर्व दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासन यांनी मान्यता दिली मात्र संकुलातील दुकाने उघडायची की नाही याबाबत संकुलातील
व्यावसायिकांमध्ये प्रचंड संभ्रम होता. याचा प्रत्यय मंगळवारी शहरात दिसून आला. शंकू ला दिवस आहे का नाही सकाळी आपले दुकान उघडली होती मात्र सगळ्यांच दुकानांचे शटर अर्धे बंद होते. मात्र काही वेळातच
हा संभ्रम दूर झाला आणि व्यवसायाला सुरुवात झाली.
उत्साह मात्र शिस्तबद्धता.
तब्बल दोन महिन्यानंतर सुरू झाल्याने व्यापाराच्या वेळेस नागरिकांमध्ये आणि दुकान मालिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहिला मिळाला. दुकान मालकांनी आपली सर्व दुकाने धुतली होती. त्यांना हार चढवले होते. व
नागरिकांनीही दुकानांमधून खरेदी करायला उत्साह दर्शवला होता. मात्र या वेळेस हा व्यवसाय शिस्तबद्ध पणे सुरू होता. कोणत्याही दुकानात पाच हून अधिक नागरिक नव्हते नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क होते.
त्यामुळे अशाच प्रकारे जर व्यवसाय चालत राहिला तर एखादवेळेस पुन्हा कठोर निर्बंधांची गरजच लागणार नाही.
जिल्हाधिकारी आणि व्यवसायिकांची बैठक झाली होती मात्र.
सोमवारी 31 मे रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व व्यवसायिकांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये शहरातील सर्वच दुकाने उघडण्यात येतील असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी
व्यवसायिकांना दिले होते. जळगाव शहरातील संकुलांमध्ये वेगवेगळे प्रवेश द्वार असल्यामुळे एकाच प्रवेशद्वारात गर्दी होणार नाही. यासाठी या संकुलांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र व्यावसायिकांच्या शिष्टमंडळांनी ही माहिती सर्व व्यावसायिकांना दिली नाही यामुळे संभ्रमाचे चित्र पाहायला मिळाले.
कोणताही संभ्रम न ठेवता संकुलातील दुकाने उघडा
ब्रेक द चेन अभियाना अंतर्गत गेल्या २ महिन्या पासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले होते.मात्र आज (१ जून) पासून यात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे.तरीही जळगाव शहरातील संकुलात व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांना दुकानं सुरु करायची कि नाही यात प्रचंड संभ्रम होता. मात्र मनात कोणताही संभ्रम न ठेवता नागरिकांनी संकुलातील दुकाने उघडावी असी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी जनशक्तीशी बोलताना दिली.ते असे म्हणाले कि, जळगाव शहरातील सर्वच संकुल उघडण्यासाठी आम्ही परवानगी दिली आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता व्यावसायिकांनी संकुलातील दुकाने उघडावी