मुंबई – राष्ट्रवादीचे जेष्ट नेते एकनाथ खडसे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.यामुळे सध्या या भेटीमागे दडल तरी काय आहे ? याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते आहे.
३१ मे रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.