जळगाव- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल रामचंद्र बर्हाटे (वय 27,
रा.रामेश्वर कॉलनी) व गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी (वय 26, रा.तुकारामवाडी) यांना पोलीस अधीक्षकांनी
जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केले आहे. हे दोघं तरुण टोळी तयार करुन दहशत पसरवित होते.
टोळी प्रमुख राहुल बर्हाटे व टोळी सदस्य गोलू उर्फ दत्तू चौधरी यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत. त्यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे तसेच डीवायएसपींच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी राहुल बर्हाटे व गोलू उर्फ दत्तू चौधरी यांना दोन वर्षांकरिता हद्दपार केले आहे. पोलीस अंमलदार इम्रान सय्यद व गोविंदा पाटील यांनी त्या दोघं तरुणांना धुळे शहरात स्थानबद्ध केले. ते दोघं जळगावातील एमआयडीसीसह जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांना शिविगाळ, दमदाटी, मारहाण व शस्त्र बाळगून जखमीही करीत होते. याबाबतची कारवाई निरीक्षक शिकारे यांच्या मार्गदर्शनाने उपपोलीस निरीक्षक रामकृ÷÷ष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, कॉन्स्टेबल सचिन पाटील, योगेश बारी आदींनी केली.
Prev Post