जळगाव – मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टीकाव यासाठी कुठली भूमिका ठरवावी या महत्त्वाच्या मुद्द्यावर सोमवारी सायंकाळी जळगाव को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटीच्या सभागृहात दीपक सूर्यवंशी यांनी मुक्त संवादाचे आयोजन केले होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांच्या अध्यक्षते खाली हि बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजू मामा भोळे, प्रतिभा शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वीरित्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पवार व रवींद्र जगताप यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन भगत निकम तर आभार प्रदर्शन अजय पाटील यांनी केले.
मराठा आरक्षणाची गरज व न्यायालयात भूमिका कशी मांडवी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झाली. केंद्र व राज्य सरकारने समन्वयाची भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी व त्यासाठी सर्व राजकीय पक्ष व राज्यात लोकप्रतिनिधींनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही न्यायालयीन लढाई लढावी अशी भूमिका मांडली. केंद्र सरकारने एकमेकांकडे बोट न दाखवत आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक मताने भूमिका मांडावी अशी देखील भूमिका या वेळेस घेण्यात आली.
यांची होती उपस्थिती…..
सुरेंद्र पाटील, भरत देशमुख, बाळासाहेब सूर्यवंशी, राम पाटील, आर व्ही पाटील, राजेंद्र देशमुख, सुरेश भोईटे, उदय पाटील, जितेंद्र मराठे, शैलेंद्र पाटील, संतोष सुर्यवंशी, शांताराम पाटील, वंदना पाटील, सुरेखा पाटील, किर्तन पाटील, सुरेश पाटील, निलेश कदम, कपिल पाटील, मयूर कापसे आदी उपस्थित होते