विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ऑनलाईन पालक सभांना आज पासून यशस्वी सुरुवात झाली. यात प्राथमिक विभागात इयत्ता१ली आणि माध्यमिक विभागात इयत्ता ५ वी ची पालक सभा आज संपन्न झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा १४ जून पासून ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होणार असल्याने त्यासंदर्भात पालकांना सविस्तर माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययना संदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनात आज पहिली ते दहावीच्या वर्गांसाठी पालक सभांना यशस्वीरित्या सुरुवात झाली.
आज पाचवीच्या तिन्ही तुकड्यांची तर इयत्ता पहिलीच्या सर्व तुकड्यांची ऑनलाइन पालक सभा संपन्न झाली. यावेळी पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सुरुवातीला संगीत विभागाने सुरेख अशी प्रार्थना सादर केली.प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील यांनी पालकांशी संवाद साधत ऑनलाईन पद्धतीने मागील वर्षी विद्यार्थ्यांचे शिक्षण हे अविरतपणे यशस्वी कसं झालं त्याचा आढावा घेतला त्याच प्रमाणे या वर्षी देखील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी यशस्वी राबवता येईल यासंदर्भात पालकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या मेहनतीला पालकांनी देखील तितकाच उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी यावेळी प्राचार्यांनी अभिनंदन केले.
विवेकानंद प्रतिष्ठान ने ऑनलाइन शाळा अगदी नियमित शाळेप्रमाणे सर्व तासिका घेत सुरु ठेवल्याने समाजात एक मोठा आदर्श निर्माण केला असल्याचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी यावेळी सांगितले. पालकांच्या सर्व शंकांचे निरसन यावेळी त्यांनी केले. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण प्रक्रिया थांबवली तर विद्यार्थ्यांचं मोठ्याप्रमाणावर शैक्षणिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शैक्षणिक प्रवाहात सर्वच पालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आले.
माध्यमिक विभागात शिल्पा दिक्षित यांनी तर प्राथमिक विभागात लीना जोशी यांनी सूत्रसंचालन केले. त्याचबरोबर निलेश चौधरी आणि स्मिता भामरे यांनी परिचय करून दिला तर मृणालिनी पाठक आणि मधुश्री मदाने यांनी गतवर्षाचा शैक्षणिक आढावा,आणि शाळेचे विविध सांस्कृतिक उपक्रम याबद्दल पीपीटीच्या माध्यमातून ऑनलाइन सादरीकरण केले. या ऑनलाईन पालक सभेसाठी माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे प्राथमिक विभागाच्या समन्वयिका रत्नमाला पाटील यांनीदेखील पालकांशी सुसंवाद साधला पालकांच्या विविध शंकांचे निरसन यांनी केले . संपूर्ण सभांसाठी भुषण साळुंखे यांचे तांत्रिक सहाय्यक लाभले.
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दिनांक ८ जून ते १४ जून दरम्यान सकाळी ७.३०ते ८.३० माध्यमिक विभाग आणि सकाळी ९ते१० प्राथमिक विभागाच्या पालकसभा घेतल्या जाणार आहेत, तर दि. १३, १४ आणि १५ जून रोजी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील आणि समन्वयिका सविता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पूर्व प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी ऑनलाइन पालक सभा घेतल्या जाणार आहेत.
आज दोन्ही विभागांमध्ये अतिशय हसत-खेळत पालक सभा संपन्न झाली त्याचबरोबर शाळा प्रशासनाच्या कार्यप्रणाली बद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.