पुणे – यंदाच्या आषाढी पंढरपुर वारी सोहळ्या संधर्बात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले कि यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच हा सोहळा साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे.