महामार्गावरील रस्तालूट प्रकरणातील तिघं अटकेत

 

जळगाव । मुक्ताईनगर शहरातील एका पत्रकाराची कार जळगावातील खोटेनगराजवळील राधिका हॉटेलसमोर थांबवून त्यांची रस्तालूट करणार्‍या टोळीतील तीन जणांना तालुका पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याक डून गावठी पिस्तूल, चॉपर, चाकू व रक्कम जप्त केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात संशयितांना अटक केली. मुक्ताईनगर शहरातील पत्रकार आतिक बिलाल खान (वय 47) हे आपल्या मुलाकरिता इंजेक्शन आणण्यासाठी गुरुवारी धुळे येथे गेले होते. धुळ्याहून परतत असताना गुरुवारी दुपारी 4 वाजता विद्यापीठ ते गुजराल पेट्रोल पंपादरम्यानच्या महामार्गावर त्यांच्या स्विफ्ट गाडी (क्र.एमएच 18डब्ल्यू 6885) ला मागून ओव्हरटेक करुन प्रत्येकी डबलसीट असणार्‍या दोन मोटारसायकलस्वारांनी त्यांची कार आडवली. या वेळी चार जणांनी शि विगाळ, मारहाण केली. त्यांच्या खिशातील 600 रुपये रोख व एक पेन हिसकावून घेत मोटारसायकलस्वार पसार झाले.
याप्रकरणी आतीक बिलाल खान यांनी मुक्ताईनगर येथे गेल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
नंतर हा गुन्हा शून्य क्रमांकाने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तालुका पोलिसांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. रोहन उर्फ रॉनी मधुकर सपकाळे (रा.दांडेकरनगर, पिंप्राळा) याचा रस्तालुटीत समावेश आहे. तो खोटेनगरजवळ वाहन (क्र.एमएच.19.क्यू.0990) ने फिरत असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी तत्काळ खोटेनगर स्टॉपवर धाव घेऊन रोहन सपकाळे याला ताब्यात घेतले. त्याच्या वाहनात गावठी पिस्तूल, चॉपर, चाकू व लुटीतील सहाशे रुपये पोलिसांनी जप्त केले. या लुटीत अनिकेत मधुकर सपकाळे (रा.दांडेकरनगर) व सतीश रवींद्र चव्हाण (रा. ओमशांतीनगर) यांचा देखील समावेश असल्याचे कळताच त्यांनाही अटक करण्यात आली.
ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मागदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक क ल्याण कासार, सतीश हाळणोर, वासुदेव मराठे, विजय दुसाने, ललित पाटील, प्रवीण हिवराळे, सुशील पाटील, अनिल मोरे, दीपक कोळी, दीपक राव आदींनी केली आहे.