जळगाव – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. या पतसंस्थेच्या घोटाळ्यात आज झालेल्या अटकेच्या कारवाईचे स्वागतच केले पाहिजे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आमदार असो वा कुणी अन्य असो कायद्यासमोर सगळेच सारखे आहे. या प्रकरणात प्राथमिक स्वरुपात कर्जदारांनी ठेवींच्या पावत्या २० टक्के, ३० टक्के दराने तोडून भरणा केलेला दिसतो. त्यामुळेच हि कारवाई झालेली आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरु असून जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेेते माजी मंत्री एकनाथराव खडसे ह्यांनी दै.जनशक्तीला दिली.