आदिवासी कोळी बांधवांवर अन्याय करणार्या जीआरची आदिवासी कोळी समाज बांधवांकडून होळी…

जळगाव – जून रोजी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांकडून 7 जुन 2021 रोजीच्या राज्यातील 1 कोटी आदिवासींना नामशेष करणारा शासकीय आदेश रद्द व्हावा यासाठी

निवृत्त न्यायाधिश हरदास कमीटीने दिसलेल्या आदेशाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. हरदास कमीटीने दिलेल्या या आदेशाची यावेळी समाज बांधवांकडून जाहीर होळी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, राज्यात अनुसूचित जमातीच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळवितांना येणार्या अडचणी दुर व्हाव्यात याकरिता दि.14/01/2021 रोजी निवृत्त न्यायाधिश हरदास यांचे अध्यक्षतेखाली शासनाने नेमलेल्या समितीने दि.29 मे 2019 ला आपला अहवाल शासनाला दिला. तब्बल एक वर्षानंतर त्यावर अंमलबजावणी करीता दि. 7/6/2021 ला आदिवासी विभागाने आदिवासी कोळी बांधवांना अपेक्षीत नसलेला असा अन्याय करणारा आदेश काढला. या आदेशा विरुद्ध आज संपुर्ण महाराष्ट्रभर आदिवासी कोळी समाजाचे नेते डाॅ. दशरथजी भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या आदेशाची होळी करुन निषेध नोंदवण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी ही आज या आदेशाचा निषेध नोंदवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आदेशाची होळी केली.

यावेळी अँड. गणेश सोनवणे, डाॅ. शांताराम सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, नितीन कांडेलकर, मंगल कांडेलकर, जगदीश सोनवणे, मालतीताई तायडे, जि.प.सदस्या वैशालीताई तायडे, प्रदिप धायडे, संजय कांडेलकर, संतोष कोळी, संजय कोळी यांसह जिल्हाभरातील असंख्य आदिवासी कोळी समाज बांधव उपस्थित होते.