माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त अभिषेकासह विविध कार्यक्रम

जळगाव- श्री माहेश्‍वरी युवा संघटना व शहर माहेश्‍वरी सभेतर्फे महेश नवमी उत्सव 2021 निमित्त शहरात शनिवारी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, उपक्रम झाले. संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांतर्फे बालाजी मंदिरात सकाळी भोलेनाथ यांचा अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. पांजरापोळ येथील गोशाळेत गोसेवा व महाप्रसाद वितरण करण्यात आले. अयोध्यानगरातील हनुमान मंदिर परिसरातील महादेव मंदिरात आंब्याच्या फळांची आरास करण्यात आली. ही आरास किशोरी मंडळातर्फे करण्यात आली. माहेश्‍वरी बोर्डींगमध्ये रक्तदान शिबिर आणि विविध ठिकाणी वक्षारोपण करण्यात आले. तसेच आदर्शनगरात अन्नदानाचा कार्यक्रम झाला. या वेळी युवा संघटनेचे अध्यक्ष मधुर झंवर, शहर सभेचे अध्यक्ष योगेश कलंत्री, श्याम कोगटा, शहर सचिव विलास काबरा, जिल्हाध्यक्ष नारायण लाठी, सचिव माणकचंद झंवर, सुनील काबरा, अरुण लाहोटी, विनय बाहेती, संजय बिर्ला, राजेंद्र माहेश्‍वरी, डाॅ.गोविंद मंत्री, नीलेश झंवर, संजय चितलांगे आदी उपस्थित होते.