गिरणा नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव– गिरणा नदी पात्रात पोहायला गेलेल्या खोटेनगरातील एका तरुणाचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
खोटनगरातील हिराशिवा कॉलनीमधील शुभम उर्फ भवरलाल हिरालाल राजपूत (वय 26) हा तरुण गिरणा नदीच्या पात्रात पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. त्याची पत्नी गर्भवती असल्यामुळे ती एरंडोल येथील माहेरी गेली होती. या घटनेबाबत कळताच नातेवाईकांनी आक्रोश केला.