जळगावात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीसह चौघांविरोधात रामनंद नगर पोलिसात गुन्हा : चौघा आरोपींना अटक
जळगाव : सासरच्या जाचाला कंटाळून शहरातील विवाहितेने 25 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पाच वाजेच्या सुमारास कोठारी नगराजवळील हरी विठ्ठल नगरात घडली. दामिनी वैभव वैदकर (25) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, मयत विवाहितेवर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सासरच्या छळामुळे आत्महत्येचा आरोप : चौघा आरोपींना अटक
सासरच्या छळामुळेच मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीचे वडिल राजेंद्र रायभान धनगर (सरदार पटेल हौसींग सोसायटी, पंधरा बंगला, भुसावळ) यांनी रामानंद नगर पोलिसात दिल्यावरून संशयीत आरोपी तथा पती वैभव रामचंद्र वैदकर, सासू ज्योती रामचंद्र वैदकर, नणंद नयना रामचंद्र वैदकर, सासरे रामचंद्र वैदकर (सर्व रा.कोठारी नगर, हरी विठ्ठल नगर, जुना बाजार रोड, रामानंद, जळगाव) यांच्याविरोधात रामनंद नगर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. संशयीत आरोपी तथा सासरे हे वीज कंपनीत एच.आर.मॅनेजर पदावर तर पती विद्युत निरीक्षक कार्यालयात ज्यु.इंजिनिअर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मयत दामिनीच्या पश्चात मुलगा, पती, आई, वडील, बहिण, भाऊ असा परीवार आहे.