प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचे जनशक्तीचे मालक यतीन ढाकेंनी केले स्वागत

भुसावळातील निवासस्थानी सदिच्छा भेट : स्व.कुंदन ढाकेंच्या आठवणींना उजाळा

भुसावळ : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे मंगळवारी पक्षाच्या बैठकीनिमित्त शहरात आले असता त्यांनी शहरातील खळवाडी भागातील रहिवासी तथा दैनिक जनशक्तीचे मालक, संपादक यतीन ढाके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी यतीन ढाके यांनी गावंडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

स्व.कुंदन ढाकेंच्या आठवणीने वातावरण गहिवरले
दैनिक जनशक्तीचे तत्कालीन मालक स्व.कुंदन ढाके यांचे अलीकडील काळात अल्पशा आजाराने निधन झाल्याने यावेळी अनिल गावंडे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. स्व.कुंदन ढाके व आपली मैत्री अत्यंत घनिष्ट होती व ते नेहमीच सर्वांच्याच कामाला धावून येत असत, अशी आठवणही प्रसंगी गावंडे यांनी सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी दैनिक जनशक्तीचे मालक, संपादक यतीन ढाके, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रहारचे खान्देश प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, नगरसेवक दिलीप तिवाल (तेल्हारा) अ‍ॅड.सुधाकर खुमकर, धीरज अनिल चौधरी आदींची उपस्थिती होती.