छगन भुजबळांची निर्दोष सुटका : वरणगाव शहरात जल्लोष

महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त करताच कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतषबाजी

वरणगाव : महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केल्याननंतर रणगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भुसावळ तालुका आणि महाराष्ट्र माळी समाज महासंघ तसेच वरणगाव माळी समाज यांच्या वतीने गुरुवार, 9 रोजी सायंकाळी सहा वाजता बस स्थानक चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. ‘भुजबळ साहेब तुम आगे बढो’ च्या घोषणांनी परीसर दणाणला.

सत्य परेशान होता पराजित नही
महाराष्ट्रमधील संपूर्ण माळी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. कितीही त्रास देण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांना केला तरीही शेवटी सत्याचाच विजय झाला, असे मत यावेळी महाबल समता परीषदेचे भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष माळी त्यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी अखिल भारतीय समता परीषद भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष माळी, वरणगाव माळी समाज अध्यक्ष संजय माळी, माजी नगरसेवक बबलू माळी, माळी महासंघ जिल्हा संघटक प्रल्हाद माळी, माळी महासंघाचे वरणगाव शहराध्यक्ष सचिन माळी, दक्षता समितीच्या अध्यक्ष सविता माळी, सामाजिक कार्यकर्ते सखाराम माळी, बापू माळी, माळी महासंघ भुसावळ तालुका युवक अध्यक्ष निलेश माळी, किरण माळी, आकाश माळी, सागर महाजन, संकेत माळी, तेजस माळी, रवींद्र माळी, निखील माळी, संदीप माळी, राजू माळी, कृष्णा माळी, विनायक माळी, अविनाश माळी, बंडू माळी, विजय माळी, अतुल माळी, पिंटू माळी, पवन माळी, भुषण माळी, गोविंदा माळी यांच्यासह माळी समाज तसेच महात्मा फुले समता परीषद आणि माळी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.