भुसावळातील दहा उपद्रवींना शहरबंदीबाबत प्रस्ताव दाखल

भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर न ठरण्यासाठी प्रांताधिकार्‍यांनी यापूर्वीच 32 जणांना शहर व तालुक्यात बंदी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाने नव्याने दहा जणांचे प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पाठविले आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कुठलेही विध्न येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपद्रवी व्यक्तींना शहरबंदी करण्यात आली. 9 ते 21 सप्टेंबरपर्यत आदेश काढण्यात आले आहे. यामुळे उपद्रवींना शहरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात शहरात उपद्रवी राहू नये यासाठी नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात उपद्रवी शहरात येतात का याची शहानिशा करण्यासाठी शहर व बाजारपेठ पोलिसांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. या पथकातील पोलीस कर्मचारी नित्याने शहरबंदी असलेल्यांची तपासणी करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.