रावेर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा पदाधिकार्यांविरोधात बेछूट आरोप करीत असल्याच्या निषेधार्थ भाजपा पदाधिकार्यांनी मंत्री व राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा पुतळा बुधवार, 10 रोजी सायंकाळी पाच वाजता रावेर शहरातील रावेर तहसीलजवळ भाजपा कार्यालयासमोर जाळून निषेध व्यक्त केला होता. आंदोलन प्रकरणी भाजपा पदाधिकार्यांविरोधात रावेर पोलिसात सोशल डिस्टन्सचे उल्लंघण, जमावबंदी आदेशाचे उल्लंघण तथा विना परवानगी आंदोलन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
रावेर पोलिसात एएसआय राजेंद्र पुरूषोत्तम करोडपती यांच्या फिर्यादीवरून भाजपा युवा मोर्चाचे श्रीकांत वसंत महाजन (तांदलवाडी), भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र कडू पाटील, प्रमोद चौधरी (सिंगत), नितीन पाटील (पुरी), भूषण पाटील (वाघाडी, ता.रावेर), माजी सभापती जितेंद्र श्रीराम (निंबोल, ता.रावेर), सचिन पाटील (संभाजीनगर, रावेर), लहु जाधव (रावेर), बाळा आमोदकर (रावेर), विजय पाटील (अजनाड, ता.रावेर), राहुल व इतर 9 ते 10 इसमांविरोधात भादंवि कलम 188 सह मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37/1 (3) चे उल्लंघण 135 प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहेत.