बोदवड : शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार प्रथमेश घोलप व मुख्याधिकारी यांच्या ऊपस्थितीत शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात महिला आरक्षण निघाल्याने विद्यमाना नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांचा हिेमोड झाला आहे. येत्या महिन्यात नगरपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. त्यानिमित्त इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. विद्यमान नगरसेवक विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असुन जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र महिला आरक्षणामुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले असलेतरी आता सौभाग्यवतींना पुढे करण्याचा पर्याय मात्र उरला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदाबाबतचे आरक्षण येत्या दहा ते बारा दिवसात निघण्याची शक्यता आहे.
विद्यमान नगरसेवकांचा हिरमोड
माजी सरपंच म्हणून कारकिर्द गाजविलेल्या दोन्ही विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात जनरल व ओबीसी महिला आरक्षण निघाले आहे. त्यामुळे भावी नगराध्यक्ष पदाबाबतच्या आशेची निराशा झाली आहे. प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढली मात्र अनुक्रमे एसटी व एससी सर्वसाधारण आरक्षण सुटल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.
ही बातमी वाचली का-
प्रभागनिहाय आरक्षण सोडत अशी
प्रभाग क्रमांक एक- ओबीसी सर्वसाधारण, प्रभाग दोन- जनरल, प्रभाग तीन- ओबीसी महिला,
प्रभाग चार, पाच, सहा – जनरल महिला, प्रभाग सात- एस.टी.सर्वसाधारण, प्रभाग आठ- एस.सी. सर्वसाधारण, प्रभाग नऊ- जनरल , प्रभाग दहा- ओबीसी महिला,
प्रभाग अकरा- नरल महिला, प्रभाग बारा- ओबीसी महिला, प्रभाग तेरा- जनरल, प्रभाग चौदा- जनरल महिला,
प्रभाग पंधरा- जनरल, प्रभाग सोळा- जनरल महिला,
प्रभाग क्रमांक सतरा- ओबीसी सर्वसाधारण