यावल : मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणार्या त्रिपुरा सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी यावल शहरातील मुस्लिम बांधवांनी कडकडीत बंद पाळला. त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी यावल शहरातील सुदर्शन चौक, नगीना चौक, खिणीर्र्पुरा, डांगपुरा परीसरात तसेच विविध भागात व्यावसायीकांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली.
यावल निरीक्षकांना निवेदन
त्रिपुरा राज्यात विशिष्ट संघटनेकडून अल्पसंख्यांक बांधवांवर करण्यात आलेल्या छळासह धार्मिक स्थळांना आग लावणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावल शहरातील इमाम अहमद रज़ा एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी व शहरातील नागरीकांनी गुरुवारी यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना केली. त्रिपुरा राज्यातील निष्पाप मुस्लिम नागरीकांना जीवे ठार मारण्यात आले व त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात येऊन घरांची जाळपोळ करण्यात आल्याने त्रिपुरा राज्यातील दहशतवादी संघटनांवर बंदी घालुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाईची मागणी करून त्रिपुरा राज्यातील अल्पसंख्यांक समाजाला त्वरीत सुरक्षा प्रदान करण्याची मागणी करण्यात आली.
यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देताना हाजी असलम खान सुब्हान खान, हाजी नसीरुद्दीन शेख, मोहसीन खान गफुर खान, शेख अलताफ अब्दुल समद , हाजी शेख कलीम, मो.याकुब रीयाजोद्दीन मोयोदीन, ईसरार खान हबीब खान, अमर अली कच्छी, राशीद खान वाजीद खान, जाकीर कुरेशी आदी उपस्थित होते.