रावेरातील अल्पवयीन मुलाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

रावेर : धावत्या रेल्वे गाडी समोर येवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना रावेर-निंभोरा रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. याबाबत रावेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. लोकेश संजय महाजन (17) असे मयताचे नाव आहे.

अप ल्वे लाईनवर आत्महत्यारे

सविस्तर असे, रावेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवाशी लोकेश संजय महाजन (17) याने आत्महत्या करण्याचे उद्देशाने अप 02335 या गाडी समोर आला. गाडीची जोरदार धडक बसल्याने तो डाऊन ट्रकवर खांबा क्रमांक 477/17 वर फेकला जावून मरण पावला असल्याची माहिती रेल्वे गाडीच्या चालकाने स्टेशन मास्टर यांना दिली. याबाबत स्टेशन मास्टर गणेश कापडे यांनी खबर दिल्यावरुन रावेर पोलीस स्टेशनमध्ये 48/21 क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक अजय खंडेराव करीत आहे.