जळगावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तरुणाने केला विनयभंग

जळगाव : शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील एका भागात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून याच भागातील संशयीत आरोपी असलेला तरुण राहतो. सोमवारी अल्पवयीन मुलगी कचरा फेकायला गेली असता आरोपी तरुणाने मुलीला घरात ओढत नेले व माझ्यासोबत प्रेम करावे लागेल असे सांगून तरुणाने मुलीला दिवसभर घरात बसवून ठेवले. त्यानंतर तिच्यासोबत मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत विनयभंग केला तसेच मुलीला धमकावून भीती निर्माण केली. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या आईने मंगळवारी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख करीत आहेत.