रावेर – अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी रावेर तालुक्यातुन केंद्र प्रमुख इब्राहीन तडवी यांच्या निरिक्षणाखाली 100 टक्के मतदान झाले आहे. सकाळी सोसायटी मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार अरुण पाटील भाजपाचे सुरेश धनके यांच्यासह मतदारांनी आपला मतदाना हक्क बजावला आहे. इतर मतदारसंघात देखिल चांगला प्रतिसाद मिळत आहे कॉग्रेसच्या दोन्ही उमेदवार जनाबाई महाजन व राजिव रघुनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा देऊन आ शिरिष चौधरींना धक्का देत आधी पासुनच निवडणुकी एकतर्फे केली आहे.त्यामुळे माजी आमदार अरुण पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.