22 वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : शहरातील 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घअना खंडेराव नगरात घडली. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नाजमीन बी.फिरोज पिंजारी (22, रा.खंडेराव नगर, जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
नाजमीन बी.फिरोज पिंजारी या पती फिरोज, सासू, सासरे आणि दोन दीर यांच्यासह खंडेराव नगरात वास्तव्यास होत्या. गुरूवार, 7 जुलै रोजी सायंकाळी सासू तायराबी पिंजारी ह्या बाजारात गेल्या आणि पतीसह सासरे आणि दीर हे देखील कामाला गेले असताना नाजमीन बी.यांनी घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सासू तायराबी पिंजारी य घरी आल्या तेव्हा त्यांना सुन नाजमीन बी. हिने गळफास घेतल्याचे लक्षात आले. शेजारच्या रहिवाशांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.