220 मठांचे काँग्रेसला समर्थन

0

बंगळुरू : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यास नकार दिल्याने कर्नाटकातील माठाधिपतींनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांना मोठा धक्का दिला. भाजपच्या भूमिकेला विरोध करत कर्नाटकातील तब्बल 220 मठांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. सध्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म देण्याची मागणीने जोर धरला आहे. भाजपच्या भूमिकेला विरोध करत 220 मठांच्या मठाधिपतींनी बैठक घेऊन काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली. यामुळे भाजप समोरील अडचणीत वाढल्या आहेत. परंतु, कर्नाटकातील लिंगायत समाजातील वीरशैव समाज हा काँग्रेसच्या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहे.